मोताळा: तरोडा येथे पेट्रोलचे पैसे मागितल्याचा कारणांवरून युवकास मारहाण,७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मोताळा तालुक्यातील तरोडा येथे १८ सप्टेंबर रोजी राहुल लक्ष्मण डांगे यांनी दुचाकीमधून पेट्रोल काढल्यामुळे शुभम रामजी जाधव यांच्याकडे पेट्रोलचे पन्नास रुपये मागितले. यावरून योगेश येरवाळ, शुभम जाधव, आदित्य येरवाळ, सीताराम येरवाळ, प्रथमेश येरवाळ, गीताबाई येरवाळ आणि उखलाल येरवाळ यांनी गैरकायद्याने एकत्र येऊन राहुल लक्ष्मण डांगे याला शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी तसेच लाकडी काठी आणि गजांनी मारहाण करून जखमी केले.