साप चावल्यामुळे योगेश युवराज सोनवणे (वय ३२, रा. पिंप्राळा हुडको) या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी शनिवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.