अमरावती: अमरावतीतील प्रवीण नगर मस्जिदच्या मिनार वर वीज कोसळली; कोणताही अनुचित प्रकार नाही, मात्र वित्तीय नुकसान
गेल्या दिन दिवसांपासून अमरावती शहरात मुसळधार पावसाचे सावट पसरले असून सोमवारी सायंकाळी शहारत वादळवारा व विज कोसळलेल्या जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले आहे. या दरम्यान शहराच्या प्रवीण नगर भागातील मस्जिद वर वीज कोसळली असून मज्जीदची मिनार खचली असल्याची माहिती आहे. या घटनेत मज्जीद मधील लाईट, पंखे , एसी अशा उपकारणांचे नुकसान झाल्याने असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याने सर्वानी सुटकेचा मोकळा निश्वास घेतला.