वर्धा: भोसाय 6 हजार मेगावॅट क्षमतेचा ग्रीन पॉवर प्रकल्पासाठी शेतजमिनीचे अधिग्रहण:आ.कुणावार यांच्या दरवाढीसाठी पुढाकार
Wardha, Wardha | Sep 16, 2025 हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील भोसा या गावात केंद्र सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाकांक्षी ग्रीन पॉवर ग्रीड प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सुमारे 6000 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प असून, यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या काही जमिनी अधिग्रहित करण्यात येणार आहेत.जमिनीचे दर कमी असल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. यासंदर्भात हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी यांच्याकडे अधिक दर देण्याची विनंती केली. या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली.