अलिबाग: अलिबाग नगरपरिषद निवडणूक लढविण्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सज्ज
संपर्क प्रमुख प्रसाद भोईर
Alibag, Raigad | Nov 8, 2025 अलिबाग नगरपरिषद निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच शिवसेना लढणार असून, पक्षाला तीन जागा मिळाव्यात यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षातील नेत्यांसोबत संपर्कात आहेत. मात्र महाविकास आघाडीमध्ये घटकपक्षांनी शिवसेनेला जागा सोडण्यास हात आखडता घेतल्यास निवडणूक स्वबळावर लढण्यास पक्ष तयार असून, १० उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती, पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी दिली