खामगाव: घरात घुसून एका इसमाने एका पत्रकारास अश्लील शिवीगाळ करून चावा घेतल्याची घटना केलानगर येथे घडली
घरात घुसून एका इसमाने एका पत्रकारास अश्लील शिवीगाळ करून चावा घेतल्याची घटना केलानगर येथे २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.याबाबत पत्रकार संजय ओमप्रकाश वर्मा वय 53 वर्षे यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की,सचिन जगतराव देशमुख याने घरात घुसुन आई वडीलांना अश्लील शीवीगाळ केली व उजव्या हाताचे बोटाला चावा घेऊन मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी सचिन जगतराव देशमुख वय 37 वर्षे रा. केलानगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल.