बार्शीटाकळी: दगडपारवा प्रकल्प धरण क्षेत्रातील पावसाचा वाढता जोर पाहता व पाणी पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
दगडपारवा प्रकल्प ता.बार्शीटाकळी जि.अकोला दिलाय दगडपारवा धरण क्षेत्रातील पावसाचा वाढता जोर पाहता व पाणी पातळीत होणारी लक्षणीय वाढ पाहता नदीपात्रात आवश्यकतेनुसार विसर्ग करण्यात येणार आहे. याद्वारे सर्वांना सूचित करण्यात येते की, कोणीही नदीपात्रात उतरू नये तसेच नदीपात्रातील पंप, अवजारे अथवा तत्सम साहित्य/जनावरे हलविण्यात यावी. तरी नदी काठच्या गावातील नागरीकांनी सावध रहावे. अशी माहिती दगडपारवा प्रकल्प पूरनियंत्रण कक्ष यांच्याकडून केली आहे.