जालना: राज्य कर्मचारी संघटनेच्या संपावर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचा बहिष्कार; जिल्हा परिषद कर्मचार्याचे नियमित कामकाज सुरु
Jalna, Jalna | Apr 21, 2026 महाराष्ट्रातील 21 एप्रिलपासून पुकारण्यात आलेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांच्या अनिश्चितकालीन संपाला सुरुवात होण्याआधीच संघटनांमध्ये मतभेद उघड झाल्याने आंदोलनात फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. मंगळवार दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या संपाच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आंदोलन तीव्र हाण्या ऐवजी भरटकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या कर्मचार्यांनी सकाळपासूनच कर्तव्यावर हजर होत संपावर बहिष्कार घातला.