जालना: मंमादेवी नगर येथे महानगरपालिकेच्या घंटागाडीला आग; नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
Jalna, Jalna | May 11, 2026 जालना शहरातील मंमादेवी नगर परिसरात आज सकाळच्या सुमारास जालना महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या घंटागाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली. कचरा संकलन करून तो कचरा खाली करण्यासाठी जात असताना ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, घंटागाडीमधून अचानक धूर निघू लागल्यानंतर काही क्षणातच आगीने मोठे रूप धारण केले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली असून म