शिरूर कासार: फुलसांगवी येथे कौटुंबिक वादातून पती पत्नीला जबरी मारहाण, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
शिरूर कासार तालुक्यातील फुलसांगवी गावात कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबात मारहाणीची गंभीर घटना घडली आहे. लोणके कुटुंबातील भावांमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर तो चांगलाच उफाळून आला आणि भावाकडूनच भावालाच बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या देविदास लोणके याला तात्काळ उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात देविदास लोणके यांच्या पत्नीने आरोप केला आहे की, “संपूर्ण कुटुंबाने संगनमताने ही मारहाण केली असून आम्हाला न्याय मिळावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे