जालना: हॉटेलवर देशी दारूची चोरटी विक्री उघड; कदीम जालना पोलिसांची कारवाई; दारूच्या बाटल्या जप्त; हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा
Jalna, Jalna | Jun 27, 2026 कदीम जालना पोलिसांनी मोहरम बंदोबस्तादरम्यान कारवाई करत जुना जालना येथील एका हॉटेलवर छापा टाकून देशी दारूची चोरटी विक्री उघडकीस आणली. शनिवार दि. 27 जून 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत 3 हजार 520 रुपयांच्या 88 भिंगरी देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल सदाशिव शिवाजी मुटकुळे हे पोलीस निरीक्षक शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के यांनी कारवाई केली.