पनवेल खांदेश्वर स्थानकादरम्यान महिलांच्या डब्यामध्ये एक व्यक्ती चढला. त्याला खाली उतरण्यासाठी सांगितले असता एका तरुणीला त्याने धावत्या लोकलमधून खाली फेकले. त्यामध्ये ती जखमी झाली त्यानंतर याची दखल पोलिसांनी घेतल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता तो विकृत मनोवृत्तीचा असल्याचे निदर्शनास आले असून त्याला पोलीस कोठडी सोनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली आहे.