औसा -जिल्हा परिषद प्रशाला भादा येथे काही दिवसांपूर्वी घडलेला निरोप समारंभ संपूर्ण गावासाठी एक भावनिक क्षण ठरला. गेली अनेक वर्षे या शाळेत ज्ञानदानाचे कार्य करत असलेल्या सात शिक्षकांची प्रशासकीय बदल्यांमुळे येथून दुसरीकडे बदली झाली. या प्रसंगी विद्यार्थी आणि शिक्षक दोघांच्या डोळ्यात अश्रू दाटले.भादा जिल्हा परिषद प्रशालेविषयी खोल आपुलकी बाळगणाऱ्या या गुरुजनांनी निरोपावेळी एक हृदयस्पर्शी उदाहरण घालून दिले.