श्रीवर्धन: निगडी, श्रीवर्धन येथील सुतार आळी सामाजिक सभागृहाचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न
आज शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास निगडी, श्रीवर्धन येथील सुतार आळी सामाजिक सभागृहाचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडले. हे सभागृह विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचे एक सशक्त माध्यम ठरणार आहे. विशेषतः महिलांसाठी बचतगटांच्या बैठकांपासून ते प्रशिक्षण कार्यशाळा, सण-उत्सवांचे आयोजन, वाचन आणि सृजनात्मक उपक्रमांपर्यंत विविध उपयुक्त उपक्रम येथे राबवता येतील. या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या परिसरात सामाजिक एकजूट, विकासाची दिशा एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.