अमरावती: ओला दुष्काळ जाहीर करा – माजी मंत्री यशोमती ठाकुर यांची मागणी
विदर्भ व मराठवाडा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून, शेतकऱ्यांचे केवळ शेतीपिकांचेच नव्हे तर पशुधनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महायुती सरकारकडे जाहिरातीसाठी, टेंडरांसाठी, घरातील डेकोरेशनसाठी पैसा आहे; परंतु शेतकऱ्यांच्या व्यथा व संकटाकडे सरकार डोळेझाक करत आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे, असे मत माजी मंत्री यशोमती ठाकुर यांनी व्यक्त केले. आज शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे तातडीने ओला दुष