गोंदिया: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत (मन्नू) लिल्हारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
Gondiya, Gondia | Oct 16, 2025 गोंदिया जिल्ह्याच्या तसेच तिरोडा शहराच्या राजकारणात आज एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री हेमंत (मन्नू) शोभेलालजी लिल्हारे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटन बळकटीसाठी हा प्रवेश लाभदायक ठरणार आहे. हा पक्ष प्रवेश माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.