सातारा: साताऱ्यात लक्ष्मीपूजनानिमित्त फटाक्यांची आतषबाजी — ऐतिहासिक चारभिंती परिसरात नागरिकांची मोठी गर्दी
Satara, Satara | Oct 21, 2025 दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी सातारा शहर प्रकाश, रंग आणि आनंदाने उजळून निघाले. मंगळवार, दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. विशेष म्हणजे, दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐतिहासिक चारभिंती परिसर फटाक्यांच्या रोषणाईने दुमदुमला होता. लक्ष्मीपूजनानंतर नागरिकांनी कुटुंबासह या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. आकाशात झेपावणाऱ्या फटाक्यांच्या प्रकाशाने साताऱ्याचे आकाश उजळून निघाले होते.