अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील देहरे येथे बस व दुचाकीचा अपघात झाला होता. यात एका २० वर्षींय युवकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संतप्त नागरिकांनी आज (ता. ३०) सकाळपासूनच देहरे येथे देहरे, विळद, शिंगवे, नांदगाव ग्रामस्थांनी अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावर ठिय्या दिला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.