एका तेरा वर्षीय चिमुकल्यावर अज्ञात व्यक्तीने चाकूने जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा हल्ला करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. गंभीर जखमी मुलाचे नाव अर्णव भिमटे असे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून,कामठी शहरात ट्राफिक विभागाचे मेजर प्रमोद ठाकूर हे पेट्रोलिंग करीत असताना त्याच्याजवळ एक तेरा वर्षाच्या चिमुकला जखमी अवस्थेत आला.