जालना: आमदार नारायण कुचे व आमदार बबनराव लोणीकर यांच्या पत्रकार परिषदेला पत्रकारांचा बहिष्कार
Jalna, Jalna | Jun 11, 2026 जालना : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामे व केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी भाजपचे आमदार नारायण कुचे व आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही पत्रकार परिषद सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र नियोजित वेळ उलटून तब्बल एक तासाहून अधिक वेळ झाला तरी दोन्ही आमदार पत्रकार परिषदेसाठी उपस्थित न झाल्याने पत्रकारांमध्ये नाराजी पसरली. अखेर दुपारी सुमारे 12