वणी: जन्नत हॉटेल जवळ झालेल्या कार व ट्रकच्या अपघातातील पाच वर्षीय जखमी चिमुकलीचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू
Wani, Yavatmal | Nov 1, 2025 शुक्रवार दि. 31 ऑक्टोबरचा शहराच्या बाहेरील भागात वणी घुग्गुस मार्गावर झालेल्या भीषण अपघातात रियाजुद्दीन शेख (55) वसंत गंगा विहार, त्यांच्या तीन मुली आणि पाच वर्षांच्या पुतणीचा गंभीर अपघात होऊन अपघातात तीन मुली जागीच ठार झाल्या तर अपघाताचे दृश्य पाहून वडिलांना वृदयविकराचा झटका आला व त्याने सुद्धा जगाचा निरोप घेतला. दि. 31 ला रात्री उशीरा चौघांवर अंत्यविधी प्रकिया पार पडली. इनाया हिच्यावर नागपुर येथे उपचार सुरु होते मात्र दि. 01 ला पहाटे तिने सुद्धा जगाचा निरोप घेतला