सातारा: सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाची कारवाई
Satara, Satara | Oct 18, 2025 सातारा शहरातील पाचशे एक पाटी ते मोती चौक या दरम्यान नो हॉकर्स झोन आहे. या नो हॉकर्स झोनमध्ये किरकोळ विक्रेते शनिवारी सकाळी ८ वाजता विक्री करण्यासाठी आपली दुकाने लावून बसले होते. त्याबाबतची माहिती सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांना समजताच त्यांनी लगेच पथकास तेथे पोहचून त्या विक्रेत्यांवर कारवाई करुन त्या विक्रेत्यांना पर्यायी जागेवर बसण्यास सुचना केल्या.