भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील नगरपरिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया 2 डिसेंबर रोजी पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून, या प्रक्रियेसाठी तुमसर निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. येथील तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या कडक निर्देशांचे पालन करत दिनांक 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान मतमोजणी केंद्रावर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात..