कोपरगाव तालुक्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज ६ जानेवारी रोजी दुपारी ४ वा आमदार आशुतोष काळे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची व खत वितरकांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांना वेळेत व पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी आमदार काळे यांनी युरियाचा काळाबाजार होऊ नये, साठेबाजीवर कडक कारवाई करावी तसेच तालुक्यातील सर्व भागांमध्ये समन्यायी पद्धतीने खत वितरण करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.