पुणे शहर: "चालले आता... परत येऊ नका!" पोस्टरवरून पुण्यात वादाची ठिणगी.
Pune City, Pune | Oct 22, 2025 : सोशल मीडियावर “चालले आता... परत येऊ नका!” या पुणेरी टोल्याने खळबळ उडवली आहे. दिवाळी सुट्टीनिमित्त घरी जाणाऱ्यांवर हा टोला असल्याची चर्चा असून, ‘पुणेकर विरुद्ध बाहेरून आलेले’ असा नवा वाद पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पोस्टरला प्रत्युत्तर म्हणून एका तरुणाने “हे आपलं देखील शहर आहे, कोणाच्या बापाचं नाही,” असं लिहिलेलं पोस्टर झळकावलं आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी देशभरातून येणाऱ्यांचं केंद्र असलेल्या पुण्यात या