जिल्हा सामान्य रूग्णालयातील विविध समस्यांना घेवून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे जिल्हा शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांच्या नेतृत्वात आज दि.८ डिसेंबरला १ वाजता जटपूरा गेट ते शासकीय महाविद्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला.जिल्हा सामान्य रुग्णालयात नादुरुस्त मशिनरीजमुळे, औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांची होत असलेली गैरसोय थांबविण्यात यावी व मेडीकल कॉलेजमध्ये स्थानिकांना प्राधान्याने रोजगार देण्यात यावा अशा विविध मागण्यांना घेऊन मोर्चा काढत निवेदन अधिष्ठता यांना देण्यात आले.