नागपूर ग्रामीण: तलावात पोहण्याचा मोह नडला; दोन तरुण कामगारांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
सुटीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी दोन तरुणांचा तलावाच्या खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना१३ मे दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घडली. आदित्य रामचंद्र चहांदे आणि अभिषेक अमीरचंद सिरसाम अशी मृतकांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मृतक आदित्य आणि अभिषेक हे 'रॅमसन' कंपनीत कामगार होते. बुधवारी त्यांची नाईट ड्युटी असल्याने त्यांनी दुपारी फिरण्याचा बेत आखला.