भंडारा: 'सेवा पंधरवाडा' अंतर्गत २९ सप्टेंबर रोजी तालुक्यात विविध ठिकाणी प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष शिबिरे
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत दिनांक 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर, 2025 या कालावधीमध्ये "सेवा पंधरवाडा" साजरा करण्याबाबतचे शासनाचे निर्देश आहेत. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्याकरीता सेवा पंधरवाडयात राबवावयाचे उपक्रम हे तीन टप्प्यांमध्ये राबवयाचे असून सदर कार्यक्रमात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याबाबतचे शिबीर आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी भंडारा यांनी तहसिलदार भंडारा यांना दिले होते.