आज दिनांक 4 डिसेंबर दुपारी तीन वाजता छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या झोन कार्यकारी वॉर्ड अधिकाऱ्यांकडून जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यात होणाऱ्या विलंबामुळे नागरिक त्रस्त झाले असून, अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून अधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या गैरकारभारावर त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत त्यांनी पालिका प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.