पनवेल: पनवेल तालुका प्रेस क्लब आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक पोलिस व पत्रकार यांच्यासाठी मोफत
Panvel, Raigad | Mar 3, 2025 पनवेल (प्रतिनिधी)रायगड प्रेस क्लब अंतर्गत पनवेल तालुका प्रेस क्लबच्या वतीने आज लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल तालुका प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक पोलिस त्याच बरोबर पत्रकार यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे,सुप्रसिद्ध नेत्रचिकिस्तक तथा मेडी. डायरेक्टर लक्ष्मी इन्स्टिट्यूट चे डॉक्टर सुहास हळदीपुरकर, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पनवेल शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे,भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक नितीन पाटील उपस्थित होते. वाहतूक पोलीस हे वर्षाचे बारा महिने अहोरात्र रस्त्यावर सेवा बजावत असतात.त्यांना स्वतःच्या प्रकृती कडे लक्ष देयला सुद्धा वेळ नसतो.तीच व्यथा ही समाजाचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार.त्यांना सुद्धा समाजात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी या सर्वसामान्यान पर्यंत पोहोचवायच्या असतात.