अकोट: जिल्हाधिकारी यांना शेतकरी संघटनेचे सीसीआयच्या प्रति एकरी कापूस खरेदी मर्यादा अट हटवण्यासाठी निवेदन दिले.
Akot, Akola | Oct 31, 2025 जिल्ह्यातील अकोट तेल्हारासह इतर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रभावित करणाऱ्या सीसीआयच्या प्रति एकरी कापूस खरेदी मर्यादा हटवण्यासाठी आज शुक्रवारी जिल्हाधिकारी मीना यांनी शेतकरी संघटनेने निवेदन दिले.सी सी आय ने कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति एकर खरेदी 5 क्विंटल 60 किलो ची अट घातल्याने ही अट कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापूस विक्रीत मोठा अडथळा ठरणार असल्याने कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा नडवल्या जाणार असल्याने ही अट रद्द करण्याची मागणी निवेदनातून शेतकरी संघटनेने केली आहे.