पुरण परिसरातील पागोटे गावचे माजी सरपंच योगेश पाटील आपल्या गाडीतून जात असताना एका कंटेनर ने त्यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर ते गाडीतून खाली उतरून जाब विचारण्यासाठी गेले असतात तेथील जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रसंगावधान राखते तातडीने गाडीत बसले आणि तेथून पळ काढला त्यामुळे ते थोडक्यात बचावले. मात्र जमावाकडून दगडफेक करण्यात आली.हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून सीसीटीव्हीच्या आधारे उरण पोलीस तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.