निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज,मतदानासाठी सुट्टी,नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे: जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
मतदान केंद्रावर साहित्य पोहचवण्यात आले आहे,अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.सर्व निवडणूक अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे निवडणूक यंत्रणा सज्ज आहे मतदान प्रक्रिया शांतता पार पडेल याबाबत प्रशासनाला विश्वास आहे अस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले.