धामणगाव रेल्वे: राठी नगर येथे गळफास घेऊन तरुणीची किरायाच्या रूम मध्ये आत्महत्या
राठी नगर परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीने किरायाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली.ईशा कुंजन आडे (वय १८, रा. देवगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती तिच्या आई व मोठ्या बहिणीसोबत राठी नगर येथील किरायाच्या घरात राहत होती. बारावी कॉलेजमध्ये डमी प्रवेश घेतलेल्या ईशा एका खाजगी कोचिंग क्लासला जात असे.काही दिवसांपूर्वी नागपूर येथे ईशाच्या मावशीचे ऑपरेशन झाल्याने तिची आई आणि दोन्ही बहिणी मावशीला भेटण्यासाठी चार दिवसांपूर्वी गेलेल्या.