नागपूर ग्रामीण: मानसिक तणावातून युवकाचे आत्महत्येचे नाट्य; अखेर पोलीस आणि शेजाऱ्यांच्या प्रयत्नाने वाचले प्राण
कोराडी रोडवरील माडर्न स्कूलच्या मागे असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून एका १७ वर्षीय युवकाने आत्महत्येची धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली होती. 'सैय्यद जामिर हुसेन' (वय १७ वर्ष, राहणार स्मृती नगर, बोखारा असे या युवकाचे नाव आहे.आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास मानसिक तणावाखाली असलेल्या सैय्यदने पाण्याच्या टाकीवर चढल्यावर आत्महत्येची धमकी देऊ लागला. ही बाब निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी त्याला खाली उतरण्यासाठी विनंती केली, परंतु तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.