नागपूर ग्रामीण: नाना पटोले दलित विरोधी, रेती तस्करांना पाठीशी घालत आहेत: आ. परिणय फुके यांचा गंभीर आरोप
भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार परिणय फुके यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोले आणि काँग्रेस पक्ष हे दलित विरोधी असून, त्यांनी भंडाऱ्यात एका दलित उमेदवाराचा अर्ज मागे घ्यायला लावून रेती तस्कराला अप्रत्यक्षपणे समर्थन दिले आहे, असे फुके यांनी म्हटले आहे.