वर्धा जिल्ह्यातील सहा नगरपालिकेच्या निवडणुकांच्या निकाल दिनांक 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जवळपास लागला असून जिल्ह्यात तीन नगरपालिकेवर भाजप तर दोन नगरपालिकेवर काँग्रेस तर एक अपक्ष उमेदवार विजय झाले.वर्धात काँग्रेसचे सुधीर पांगुळ,पुलगाव येथे काँग्रेसच्या कविता ब्राह्मणकर,हिंगणघाट येथे भाजपच्या नयना तुळसकर,आर्वी येथे भाजपच्या स्वाती गुल्हाने,सिंदी रेल्वे येथे भाजपच्या राणी कलोडे तर देवळी येथे अपक्ष उमेदवार किरण ठाकरे हे नगराध्यक्ष पदाकरिता निवडून आले आहेत.