. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे आज 16 ऑक्टोबरला 12 वाजता सवलतीच्या दरात पुस्तक विक्री आयोजित करण्यात आली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा तसेच त्यांच्या विचारांवर आधारित आणि संवैधानिक मूल्यांचा जागर करणारी पुस्तके विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली होती. पुस्तक विक्रीदरम्यान शासकीय प्रकाशनांवरील पुस्तकांवर 85 टक्के, तर अशासकीय प्रकाशनांवरील पुस्तकांवर 50 टक्के सवलत देण्यात आली.