पोलादपूर: पोलादपूर-महाबळेश्वर राज्यमार्गावर खड्डयांचे साम्राज्य वाढल्याने हैराण
पोलादपूर सुरूर महाबळेश्वर राज्य मार्गावरील पोलादपूर ते कापडे रस्त्यावर सर्वत्र खड्डयांचे साम्राज्य पसरले असून या खड्यांवर संबंधित विभाग प्रशासनाकडून लाल मातीची बोळवण रस्त्यावर टाकण्यात येत असल्याने सर्वत्र धुरळा उडत असून एखादी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे या विभागातील जनतेकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या रस्त्यावर संबंधित खाते व प्रशासनाकडून लाल मातीचा मुलाला टाकून खड्डे भरले जात असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसून येत असून संबंधित खाते एखादा मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल या विभागातील प्रवासी जनतेकडून व्यक्त केला जात आहे.