सातारा: बस स्थानका शेजारी पार्किंगच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, सहा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, एकाला अटक
Satara, Satara | Sep 15, 2025 दुचाकी पार्किंगच्या वादातून स्वयंम विजय साबळे (वय २१, रा. शिवथर, ता. सातारा) या महाविद्यालयीन तरूणावर कोयत्याने वार करण्यात आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी एका तरूणाला अटक केली आहे. ही घटना दि. १४ रोजी दुपारी सातारा बसस्थानकासमोरील सेव्हन स्टार इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली.सुमीत पवार, साहिल बामणे (रा. करंजे), गाैरव सावंत (रा. एकसळ, ता. कोरेगाव), आदित्य, यश मांढरे, प्रज्वल अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयिताची नावे आहेत.