आज सोमवारी सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात आज ‘जनता संवाद’या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रायगड लोकसभा मतदारसंघातील आणि राज्याच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांनी खासदार सुनील तटकरे यांच्यासमोर आपल्या समस्या, अडचणी, प्रलंबित प्रशासकीय कामासंदर्भातील प्रश्न मांडले. या सर्वांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यासंदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यानिमित्ताने मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांचा आढावा जाणून घेत ती कामे प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. यावेळी मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.