शिरोळ: जयसिंगपूरात मच्छी मार्केट येथे हॉटेल मधुरा शेजारी आडोशाला उघड्यावर मटका घेणाऱ्यावर कारवाई
जयसिंगपूर शहरातील मच्छी मार्केट येथे हॉटेल मधुरा शेजारी आडोशाला उघड्यावर मटका घेणाऱ्या वर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मध्ये दत्ता यामनाप्पा कलगुटगी वय 64 राहणार समडोळेमळा शाहूनगर जयसिंगपूर आणि बुक्की मालक सुनील काळे राहणार सांगली यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.याबाबत जयसिंगपूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती नुसार आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी हे आपल्या ताब्यात असलेल्या आयटेल कंपनीच्या मोबाईलवर मटका घेताना मिळाला.