संग्रामपूर: टाकळी खासा येथे आमदार संजय कुटे यांच्या हस्ते घर बांधकाम करण्यासाठी १ लाख रुपयांचे अनुदान वाटप
महत्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्प अंतर्गत मौजे गोळेगाव खुर्द येथील पुनर्वसित नागरिकांना टाकळी खासा येथे आक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता घर बांधकाम पायाभरणीकरिता ₹1 लक्ष रुपयांचे वाढीव अनुदान संग्रामपूर जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.यावेळी जिगांव पुनर्वसन विभाग खामगावचे कार्यकारी अभियंता तुषार मेतकर, उपविभागीय अभियंता रवींद्र विश्वकर्मा यांच्यासह लाभार्थी नागरिक बांधव उपस्थित होते.