शासनाच्या धोरणांमुळे आणि सीसीआयच्या मर्यादित खरेदीमुळे शेतकऱ्यांना योग्य दर न मिळाल्याने प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अकोट ते अकोला हे 50 किलोमीटर पायदळ कापूस दिंडी आयोजित करण्यात आली आहे. यंदा कापसातील उत्पादन घट, वाढती खर्चिक परिस्थिती आणि बाजारभावातील घसरलेली पातळी यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.शेतकऱ्यांना एकरी 15 क्विंटल मिळत असून शासन केवळ 5.6 क्विंटल खरेदी करत आहे ही मर्यादा 11 क्विंटल पर्यंत करावी या मागणीसाठी ही पायदळ वारी काढण्यात आली.