धर्माबाद: अनेक दिवस बेल्लूर बु. येथील पुलावरून पाणी वाहून गेल्याने पुलालगतचा रस्ता गेला उखडून, रस्ता दुरुस्ती करण्याची गरज
दि. 24 सप्टेंबर पासून धर्माबाद तालुक्यातील बेल्लूर बु. हा पूल पाण्याखाली गेला होता.त्यामुळे तेलंगणा राज्यातील कंदकुर्ती बोधन जाणारा हा प्रमुख रस्ता बंद होऊन वाहनांची आवाजावी बंद झाली होती.आजरोजी सकाळी च्या सुमारास पूलावरून धावणारे पाणी ओसरून गेले आहे मात्र ह्या पुलाची अवस्था ही खस्ता झाल्याचे दिसत आहे. सदर पुलालगतचा रस्ता पावसाने उखडून गेला आहे, त्यामुळे वाहन धारकांना आता येजा करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार असून ह्या रस्त्याची दुरुस्ती करणे महत्वाचे बनले आहे.