जिल्ह्यातील शंकरपूर-कवडशी रस्त्यालगत शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे काल (दि. ९ डिसेंबर ला सायंकाळी उघडकीस आले. शेषराव नथु झाडे (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.