जालना: जालना पोस्ट ऑफिसमधून तलवारींचा साठा जप्त; 48 हजारांचा मुद्देमाल हस्तगत, एक जण ताब्यात
Jalna, Jalna | Apr 16, 2026 जालना शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातून पार्सलमधून दोन धारदार तलवारी जप्त करत सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धडाकेबाज कारवाई केली. गुरुवार दि. 16 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत एकूण 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस ठाणे सदर बाजारच्या डीबी पथकाचे प्रमुख पोउपनि सचिन सानप व त्यांचे पथक 16 एप्रिल 2026 रोजी ठाण्यात हजर असताना दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली होती.