रोहा: मंत्रालयात तळा तालुक्यातील आंबा फळपीक विमा भरपाईसंदर्भात बैठक
Roha, Raigad | Oct 28, 2025 आज मंगळवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास मंत्रालयात राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील आंबा फळपीक विमा भरपाईसंदर्भात आयोजित बैठकीस खासदार सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत शेतकऱ्यांना विमा भरपाईची आर्थिक मदत वेळेवर आणि पारदर्शकपणे मिळावी, यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, रायगड-अलिबाग जिल्हाधिकारी आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते.