गंगाखेड: तरफ्यातून प्रवास करत पुरग्रस्त खळी गावात डॉक्टर असोसिएशनने केली आरोग्य तपासणी : सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक
गंगाखेड तालुक्यातील खळी- गौंडगाव रस्यावर गावात येणाऱ्या पुल व ओढ्याचा पुलावरून पाणी वहात आसल्याने हे दोन्ही पुल रहदारीसाठी बंद. अशा कठीण परिस्थितीत जीव धोक्यात घालून डॉक्टर असोसिएशन ऑफ गंगाखेडचे सभासद व वैद्यकीय अधिकारी शिबीरासाठी खळी गावात 2 ऑक्टोबर रोजी दाखल झाले आणि पुरग्रस्त रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. २ आक्टोंबर रोजी गांधी जयंती निमित्त खळी आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात डॉक्टर असोसिएशनचे टीम व वैद्यकीय अधिकारी यांनी मधुमेह