आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गांधी चौक येथे आज दि 17 डिसेंम्बर ला 12 वाजता भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर चे कार्यालय सुरू करण्यात आले. सुरू झालेल्या नव्या कार्यालयात पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, माजी महापौर राखी कंचरलावार आदींसह उपस्थित होते.